खड्डे उदंड झाले, शासनाने बुजवावे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 सप्टेंबर 2019

थडीपवनी: सुबोध भावे, प्रशांत दामले यांनी रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत सोशल मीडियातून नाराजी व्यक्त केली. अन्य कलावंतांचासुद्धा त्याचे समर्थन केले जात आहे. अभिनेत्री अलका कुबल यांनीसुद्धा शासकीय अनास्थेचा समाचार घेत सुबोध भावे, प्रशांत दामलेंच्या भूमिकेला पाठिंबा दर्शविला. कामाच्या निमित्ताने राज्यभर प्रवास करावा लागतो. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वेळेवर पोचता येत नाही, शासनाने तातडीने खड्डे बुजवावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

कृषी विकास प्रतिष्ठानतर्फे रविवारी थडीपवनी येथे आयोजित विदर्भ साहित्य संघाच्या लेखिका संमेलनात अलका कुबल यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. प्रत्येक प्रश्‍नाला त्यांनी मनमोकळी उत्तरे दिली.
अलका कुबल यांनी येणाऱ्या काळात समाजसेवेच्या क्षेत्रात कार्य करणार असल्याचे सांगितले. मिळालेल्या भूमिकांबाबत समाधानी आहे. कलावंत समाजाचे रोल मॉडेल असतात. कलावंतांनी त्यांची इमेज जपायला हवी. भावनिक भूमिका करायला आवडते. पण, त्या वास्तविक असाव्यात, असा आग्रह असतो. माहेरची साडी चित्रपटामुळे घराघरांत पोचली असली तरी त्यामुळे माझी ओळख रडूबाई अशी झाली आहे. पुढेही तशाच भूमिका मिळत गेल्या. पण, प्रत्यक्ष जीवनात मात्र रडूबाई नाही तर डॅशिंग वूमन आहे. कुणाकडूनही अन्याय सहन करीत नाही. रडूबाईच्या भूमिकांचा कंटाळा आल्याने पाच वर्षे सिनेमात कामच केलं नाही. लवकरच काही चित्रपट येत असून त्यात वेगळ्या भूमिकेत मी दिसणार आहे. तत्त्वे कधीच सोडली नाहीत. चंदेरी दुनियेत येणाऱ्या मुलींनी तत्त्वाशी तडजोड न करता ध्येयाने पुढे जावे, असा हितोपदेश त्यांनी दिला. वैदेही चवरे-सोईतकर व अनिता घारपुरे यांनी त्यांची मुलाखत घेतली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The pits are huge, the government should quench it