खापरखेडा ः उड्‌डाणपुलावर अजूनही कायम असलेले जीवघेणे खड्डे.
खापरखेडा ः उड्‌डाणपुलावर अजूनही कायम असलेले जीवघेणे खड्डे.

प्रकाशमान भानेगावच्या विकासात खड्डे 

खापरखेडा(जि.नागपूर) :  राज्याला प्रकाशमान करण्यात खापरखेडा वीजनिर्मिती केंद्राचे मोठे योगदान असून एकीकडे या वीजनिर्मिती केंद्राला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. नवीन बिना ते भानेगाव या कामठी मार्गावर महाजेनकोने उड्डाणपूल तयार केला. या उड्डाणपुलावर मागील अनेक महिन्यांपासून जीवघेणे मोठे खड्डे पडलेले आहेत. शिवाय ते खड्डे अधिक खोलगड होऊ लागले आहेत. मात्र, या जिवघेण्या खड्ड्याला बुजवणार कोण? असा सवाल स्थानिक नागरिकांसह वाहनचालकांनी उपस्थित केला जात आहे. 
एकीकडे वीजनिर्मिती केंद्रात कोळसा वाहतुकीकरिता रेल्वे ट्रॅक तयार करून मालगाडीने लोकलसह परप्रांतांमधून कोळसा वीजनिर्मिती केंद्रात कोळसा आणला जातो. अशावेळी मालगाडी आल्यावर इतर वाहतुकीच्या सोयीकरिता महाजनकोने उड्डाणपूल निर्माण केला. उड्डाणपुलाखालून रेल्वे मालगाडीने कोळसा वॅगनने येतो, तर उड्डाणपुलावरून हलक्‍या व जड वाहनांची वाहतूक होत असते. विशेष म्हणजे महाजेनकोने उड्डाणपूल तयार करून तर दिला, पण वरील उड्डाणपुलाचा मुख्य मार्ग हा महामार्गाला जोडणारा असून हा मार्ग सार्वजनिक बांधकाम विभागात येतो. त्यामुळे या उड्डाणपुलावरील खड्डे कोण बुजवणार, हे मात्र समजण्यापलीकडे असल्यामुळे या जीवघेणे खड्डे वाहनचालकांना अपघाताचे निमंत्रण देत आहे. मात्र, संबंधित प्रशासन कुंभकर्णी झोपेतच आहे. शिवाय या उड्डाणपुलावर लावण्यात आलेले पथदिवे मागील अनेक महिन्यांपासून बंद असल्याने अंधारातून मार्गक्रमण करावे लागते. या मार्गावरून हलक्‍या अथवा जडवाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असून जवळपासच्या कोळसा खाणीतून ट्रकद्वारे वीजकेंद्रांना कोळसा पुरवठा केल्या जातो. अनेकदा कोळशाचे भरलेले ट्रक अथवा खाली ट्रक अचानक काही बिघाड झाल्याने उड्डाणपुलावर एखाद्या वेळी उभी असते. त्यामुळे संभाव्यत: अशावेळी काळोख अंधारामध्ये अपघात होण्याची दाट शक्‍यता असते. पथदिवे मेन्टेनन्स करणे गरजेचे आहे. वीजनिर्मिती केंद्राने लावलेले पथदिवे असून पथदिवे बंद असल्याच्या काही तांत्रिक अडचणीमुळे पथदिवे बंद जरी पडले तरी सुरू करण्यास दिरंगाई होत असल्याची चर्चा नागरिकात आहे. परंतु, अशा गंभीर विषयांची संबंधित प्रशासनाला जाग कधी येणार, हे मात्र कळायला मार्ग नाही. 
पुलाचे हस्तांतरण बांधकाम विभागाकडे 
रेल्वेने लोकलसह परप्रांतातून आणत असलेला कोळसा खाणीतील कोळसा वीजनिर्मिती केंद्रात आणण्याकरिता मुख्य मार्गावर रेल्वे लाइन टाकण्यात आल्या. इतर वाहतुकीकरिता नागरिकांना रेल्वे क्रॉसिंगचा त्रास होऊ नये म्हणून वरून उड्डाणपूल बांधण्यात आला. वाहतूक सुरू झाली असताना हा उड्डाणपूल महाजनकोने सार्वजनिक बांधकाम विभागाला हस्तांतरित केला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com