Kharif Season : यंदाच्या खरिपात नेमके कोणते पीक घ्यावे कळेना! बळीराजा द्विधा मनस्थितीत; शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी हवालदिल
Agriculture Crisis : नांदुरा तालुक्यातील शेतकरी सध्या खरीप हंगामात कोणते पीक घ्यावे, या मोठ्या संभ्रमात आहे. उत्पादन खर्च वाढला, पण दर मात्र हमीभावापेक्षा कमीच.
नांदुरा : गेल्या दोन तीन वर्षांपासून कोणत्याच पिकाला उत्पादन खर्चावर आधारित दर मिळत नसल्याने बळीराजा पुरता हवालदिल झाला असून यंदा खरीपात नेमके कोणते पीक घ्यावे हे पण त्याला सुचेनासे झाले आहे.