पीएम किसान पोर्टल ठरले डोकेदुखी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PM Kisan Yojana E-KYC issue

पीएम किसान पोर्टल ठरले डोकेदुखी

जामली : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी पीएम किसान पोर्टलवर नोंदणीकृत पात्र लाभार्थ्यांची ई-केवायसी विशेष जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेला ३१ मेपर्यंत मुदतवाढ दिली. मात्र पोर्टलवर ई-केवायसीसाठी ओटीपी प्राप्त करूनही समाविष्ट होत नसल्याने हे पोर्टल शेतकऱ्यांना डोकेदुखी ठरत आहे.

मोहिमेसाठी यापूर्वी ३१ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली होती. परंतु केवायसी अहवालाची पाहणी केली असता अल्प प्रमाणात लाभार्थ्यांनी ई-केवायसी केलेली असल्यामुळे या मोहिमेत ३१ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पात्र पीएम किसान पोर्टलवरील ई-केवायसी करण्यासाठी ओटीपी किंवा बायोमेट्रिक हे पर्याय उपलब्ध करून दिले आहे.

प्रधानमंत्री सन्मान किसान निधी http//pmkisangov.in या बेवसाईटवर ई-केवायसी करता येते. मात्र संकेतस्थळावरील ‘फॉर्मर कॉर्नर’टॅक्समध्ये किंवा या पीएम किसान अ‍ॅपद्वारे लाभार्थ्यांना ई-केवायसी प्रमाणीकरण मोफत करता येईल, असे म्हटले आहे. मात्र ओटीपी मिळाल्यानंतरही केवायसी प्रक्रिया पूर्ण होत नसल्याने शेतकऱ्यांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

केवायसी बंधनकारक

पीएम किसान योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना पुढील एप्रिल जुलै २०२२ या कालावधीचा लाभ प्राप्त होण्यापूर्वी ई-केवायसी प्रमाणीकरणाची प्रक्रिया बंधनकारक आहे. ३१ मे अखेरपर्यंत पूर्ण करावी, असे महसूल अधिकाऱ्यांनी कळविले आहे.

Web Title: Pm Kisan Portal Became Headache Farmers Affected E Kyc Extended Second Time

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top