
चेतन बेले
नागपूर : शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा २० व्या हप्त्याचे वितरण करण्यात आले. लाभासाठी ई-केवायसी करणे गरजेचे आहे. मात्र सूचना देऊनही केवायसी पुर्ण न केल्याने जिल्ह्यातील १२ हजार ८३४ शेतकऱ्यांच्या सन्मान निधी थांबवण्यात आला आहे. यात मृत शेतकऱ्यांच्या वारसांची संख्या निम्मी असल्याचे सांगण्यात आले.