
अमरावती : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) राज्यातील २१ जिल्ह्यांत राबविण्यात येत आहे. यामध्ये विदर्भातील ४ हजार २८४ गावांचा समावेश करण्यात आला. राज्यात राबविण्यात येणाऱ्या या योजनेसाठी जागतिक बॅंकेच्या साहाय्याने सहा हजार कोटी रुपयांच्या निधीस तत्त्वतः मान्यता देण्यात आली आहे.