धक्कादायक प्रकार! पोलिस शिपायानं ठाण्यात केली मारहाण अन् मुलगा अचानक झाला बेपत्ता; शोधाशोध सुरु 

श्रीकांत पशेट्टीवार 
Thursday, 18 February 2021

प्रताप बाबू पवार (18) हे बेपत्ता झालेल्या मुलाचे नाव आहे. बुधवारी सायंकाळी सहा वाजता जिवती पोलिसांनी बाबू मुन्ना पवार यांना पकडून नेले. याची माहिती मुलाला मिळताच तो ठाण्यात विचारपूस करण्यासाठी आला. तेव्हाच प्रताप पवार याला पोलिसांकडून अपमानास्पद वागणूक मिळाली. 

जिवती (जि. चंद्रपूर) ः वडिलांना पोलिसांनी पकडून नेल्याने ठाण्यात विचारपूस करण्यासाठी आलेल्या मुलाला पोलिस हवालदाराने अपमानास्पद वागणूक देऊन मारहाण केली. या घटनेनंतर मुलगाही बेपत्ता झाला. ही घटना बुधवारी (ता. 17) सायंकाळी जिवती येथे घडली. दरम्यान, वडील बाबू पवार याने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

हेही वाचा - ...अन् ट्रॅक्टर वर स्वार होऊन वधू पोहोचली मंडपात; शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्याकरता उचललं पाऊल

प्रताप बाबू पवार (18) हे बेपत्ता झालेल्या मुलाचे नाव आहे. बुधवारी सायंकाळी सहा वाजता जिवती पोलिसांनी बाबू मुन्ना पवार यांना पकडून नेले. याची माहिती मुलाला मिळताच तो ठाण्यात विचारपूस करण्यासाठी आला. तेव्हाच प्रताप पवार याला पोलिसांकडून अपमानास्पद वागणूक मिळाली. 

त्याला मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आले. त्यानंतर त्याने मी घर सोडून जात असल्याचे एका वहीवर लिहले. आपला मोबाईलही त्याने घरी ठेवत तो बाहेर पडला. बापाला सोडविण्यासाठी पोलिस ठाण्यात गेलेल्या मुलाला पोलिसांनी मारहाण केली. अपमानास्पद वागणूक दिल्यानेच माझा मुलगा बेपत्ता झाल्याचा आरोप आईने केला आहे. 

हेही वाचा - अमरावती, यवतमाळ, अकोला या जिल्ह्यांमध्ये कंटेनमेंट झोन जाहीर करा; मुख्य सचिवांचे जिल्हाधिकाऱ्यांना...

आई- वडिलांनी मुलाची बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली आहे. मुलाचा शोध घेऊन मुलगा परत आल्यावर त्या मुलावर अन्याय झाला असेल तर संबंधितावर योग्य ती कार्यवाही केली जाईल.
- संतोष अंबिके, 
सहायक पोलिस निरीक्षक जिवती 

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police beat boy and he got disappear in Chandrapur district