esakal | रात्री शहरात घातली गस्त, पहाटे पुढे आली ही धक्कादायक घटना...
sakal

बोलून बातमी शोधा

patroling van

घटना उघडकीस येताच कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत राजू उईके यांचा मृत्यू झाला होता. त्यांनी मृत्यूपूर्व चिठ्ठी लिहून ठेवली असून आपण पाठीच्या दुखण्याने त्रस्त आहोत, असे नमूद असल्याची माहिती सूत्रांनी दिली. वरिष्ठांनी त्यांना जात पडताळणी सादर करण्याचे आदेश दिले होते. त्याचाही ताण उईके यांच्यावर होता.

रात्री शहरात घातली गस्त, पहाटे पुढे आली ही धक्कादायक घटना...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

यवतमाळ :  शहर पोलिस ठाण्यात कार्यरत हेड कॉन्स्टेबलने रात्री शहरात पॅट्रोलिंग करून कर्तव्य बजावले. मात्र ठाण्यात परत येताच त्याने खाकी वर्दीतच गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी (ता. ७) पहाटे पाच वाजेच्या सुमारास पोलिस ठाण्यात उघडकीस आली. या घटनेमुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

राजू खंडुजी उईके (वय 55), असे आत्महत्या करणार्‍या पोलिस कर्मचार्‍याचे नाव आहे. ते गुन्हे शाखेत होते कार्यरत होते. शुक्रवारी रात्री मेन लाईनमध्ये त्यांनी पॅट्रोलिंग करून कर्तव्य बजावले होते. कर्तव्य संपल्यानंतर पोलिस ठाण्यात पोहोचले. पहाटे चार वाजून 45 मिनिटांनी पोलिस ठाण्यातील एका खोलीत पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली.

पोलिस कर्मचार्‍याची ठाण्यातच आत्महत्या
ही घटना उघडकीस येताच कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत राजू उईके यांचा मृत्यू झाला होता. त्यांनी मृत्यूपूर्व चिठ्ठी लिहून ठेवली असून आपण पाठीच्या दुखण्याने त्रस्त आहोत, असे नमूद असल्याची माहिती सूत्रांनी दिली. वरिष्ठांनी त्यांना जात पडताळणी सादर करण्याचे आदेश दिले होते. त्याचाही ताण उईके यांच्यावर होता.

आयुक्‍त तुकाराम मुंढे यांच्या मनात चाललयं तरी काय? स्पष्ट शब्दात कळवला हा निर्णय

पाठीचा वाढत असलेला त्रास आणि नोकरी जाण्याची भीती या कारणामुळे आत्महत्येचे पाऊल उचलल्याची चर्चा पोलिस वर्तुळात ऐकायला मिळाली. घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांच्यासह अधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट दिली.