esakal | अन् पोलिस सापडला जुगार खेळताना !
sakal

बोलून बातमी शोधा

2jugar_chapa_0.jpg

आरोपी पोलिस कर्मचारी अकोटफैल पोलिस ठाण्यात कार्यरत ः विशेष पथकाची कारवाई

अन् पोलिस सापडला जुगार खेळताना !

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला  ः जिल्हा पोलिस अधीक्षक अमोघ गावकर यांच्या विशेष पथकाने शुक्रवारी (ता.24) एका जुगार अड्ड्यावर छापा टाकला. यामध्ये तीन जुगाऱ्यांसह 87 हजाराचा मुद्देमाल जप्त केला. मात्र, अटक करण्यात आलेल्या तीन जुगाऱ्यांमध्ये एकजण चक्क पोलिस कर्मचारी आढळून आला आहे. या कारवाईमुळे पोलिस विभागात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा पोलिस अधीक्षक अमोघ गावकर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख पोलिस निरीक्षक मिलिंदकुमार बहाकर यांनी जुने शहर पोलिस ठाण्यांतर्गंत येणाऱ्या महाकाली नगर भागातील अनिलकुमार चांडक याच्या रहात्या घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला. यामध्ये पथकाने शेख हुसेन उर्फ लखन शेख इब्राहिम (वय 35), अनिलकुमार गोवर्धनदास चांडक (वय 55) आणि प्रवीण घनश्‍याम भोळे (वय 47) या तिघांना अटक करण्यात आली आहे. तर आरोपी शेख रियाज ताज मोहम्मद उर्फ बिडी हा घटनास्थळावरून फरार होण्यास यशस्वी झाला. आरोपींकडून नगदी 62 हजार 400 रुपये आणि तीन मोबाइल असा 87 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

जुगारी पोलिस कर्मचारी अकोटफैल पोलिस ठाण्याचा
विशेष पथकाने अटक केलेल्या आरोपी पोलिस कर्मचारी प्रवीण घनश्‍याम भोळे (वय 47) हा अकोटफैल पोलिस ठाण्यात नाईक पोलिस शिपाई या पदावर नेमणुकीस असून, त्याच्या गैर वर्तणुकीबाबत त्याच्याविरुद्ध खातेनिहाय कारवाई करण्यात येणार आहे.

निलंबनासह बडतर्फीची कारवाई
या कारवाईनंतर विश्‍वसनिय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या आरोपी पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनासह बडतर्फीची कारवाई प्रस्तावित असून, काही दिवसांत ही कारवाई केली जाणार असल्याची माहिती आहे.
 

loading image
go to top