esakal | ब्रेकिंग न्युज - नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात, एक पोलिस जवान शहीद, दुसरा जखमी
sakal

बोलून बातमी शोधा

naxal

शहीद झालेल्या जवानाचे नाव दुशांत नंदेश्‍वर असे आहे. तर जखमी जवानाचे नाव दिनेश भोसले आहे. दोन्ही जवान कोठी येथे सकाळी ८ वाजताच्या सुमारास किराणा साहित्य आणण्यासाठी दुकानात गेले होते. दरम्यान दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी दोघांवरही अचानक गोळीबार केला

ब्रेकिंग न्युज - नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात, एक पोलिस जवान शहीद, दुसरा जखमी

sakal_logo
By
मिलिंद उमरे

भामरागड (जि. गडचिरोली) : भामरागड उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या कोठी पोलिस मदत केंद्रात किराणा साहित्य आणण्यासाठी दुकानात गेलेल्या दोन जवानांवर नक्षलवाद्यांनी अचानक गोळीबार करीत केलेल्या हल्ल्यात एक पोलिस जवान शहीद झाला असून दुसरा जखमी झाला आहे. ही घटना देशाच्या स्वातंत्र्यदिनाच्या आदल्या दिवशी शुक्रवारी (ता. १४) सकाळी ८ ते ८.३० वाजताच्या सुमारास घडली.

या घटनेत शहीद झालेल्या जवानाचे नाव दुशांत नंदेश्‍वर असे आहे. तर जखमी जवानाचे नाव दिनेश भोसले आहे. दोन्ही जवान कोठी येथे सकाळी ८ वाजताच्या सुमारास किराणा साहित्य आणण्यासाठी दुकानात गेले होते. दरम्यान दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी दोघांवरही अचानक गोळीबार केला यात दुशांत नंदेश्‍वर शहीद झाला. गोळीबारानंतर नक्षलवादी घटनास्थळावरून पळून गेले.

सविस्तर वाचा - गायक विजय चिवंडेंचे कोरोनाने निधन

हे किराणा दुकान पोलिस मदत केंद्रापासून केवळ २०० मीटर अंतरावर असल्याचे कळते. नक्षलवाद्यांची एक रॅपिड ऍक्‍शन टीम आहे. ती गुप्तपणे पोलिसांची व त्यांच्या रडारवर असलेल्या राजकीय व अन्य नागरिकांची रेकी करून हल्ले करीत असते. यापूर्वीही अशा काही घटना घडल्या आहेत. अशाच एका टीमने हा हल्ला घडवून आणल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

संपादन - स्वाती हुद्दार