Yavatmal News: पोलिस कर्मचाऱ्याने गळफास घेऊन संपवल जीवन; पोलिस मुख्यालयात चालक म्हणून होते कार्यरत
Police Officer: यवतमाळमध्ये पोलिस कर्मचारी सचिन नारखेडे यांनी बुधवारी (ता. ६) सकाळी आपल्या घरात छताला दोरी बांधून गळफास घेत जीवन संपवल. या घटनेने पोलिस वर्तुळात शोक व्यक्त केला आहे.
यवतमाळ : एका पोलिस कर्मचाऱ्याने स्वतः च्या राहत्या घरातील छताला दोरी बांधून गळफास घेत आत्महत्या केली. ही गंभीर घटना बुधवारी (ता. ६) सकाळी येथील विठ्ठलवाडी परिसरात उघडकीस आली सचिन नारखेडे (वय ३४), असे मृत पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे.