लोणार - लोणार तालुक्यातील सुलतानपूर येथे ता. ३ फेब्रुवारीच्या रात्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात अज्ञात व्यक्तीने निळा ध्वज उभारल्याची घटना ता. ४ ला समोर आल्याने पोलीसाचा तगडा बंदोबस्त दाखल होऊन तनाव सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती..सुलतानपुर येथुन जात असलेल्या दोनंही राज्य महामार्गालगत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे. पुतळया समोरील महामार्गावरील चौकात मधोमध ता. ३ च्या रात्री कोणीतरी अज्ञाताने सिमेंट टाकलेल्या ड्रम मध्ये उंच लोखंडी पाईप रोवुन त्यावर निळा ध्वज उभारला असल्याचे माहिती समजताच पोलीसांचा मोठा फौज फाटा सुलतानपुर येथे दाखल झाला..तर ग्रामस्थही मोठ्या संख्येने डॉ. बाबासाहेब आंबडेकर चौकात जमा झाले. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने अप्पर पो.अ. महामुनि, तहसीलदार भुषन पाटील, उ.वि.पो.अ. प्रदिप पाटील, पो.नि. भाऊराव घुगे, अमरनाथ नागरे, निमीश मेहेत्रे, संदिप राजे पाटील, रस्तेविकास महामंडळाचे अभियंता नमन शिंदे, ना. तहसीलदार रामप्रसाद डोळे, तलाठी संतोष पनाड, ग्रा.वि.अ. गजानन कावरखे, पो.हे.कॉ. सोमनाथ केदार, संतोष चव्हाण, राजेश जाधव, सुनिल नागरे आदिंसह राज्यराखीव पोलीस दलाचा ताफा ही परिस्थिती वर लक्ष ठेऊन होता..मात्र दुपारनंतर अधिकारी व ग्रामस्थांमध्ये सकारात्मक चर्चा होऊन ध्वजाची जबाबदारी ग्रामस्थांवर सोपविण्याचे ठरले. त्यानुसार डॉ. बाबासाहेब आंबडेकर चौकातील निळा ध्वजक्षतीग्रस्त झाल्यास, कायदा व सुव्यवस्थेबरोबरच ध्वजाची निगा राखण्याची जबाबदारी संघपाल कचरू पनाड, महेंद्र भागवतराव पनाड, अनित्य डिगांबर घेवंदे, शे. अखतर शे. कौसर, शे. अमीर शे. अहमद, प्रेम अरुण झोरे, राजेश पिंपरकर, शे. नसीर, मनोहर, पनाड, बेबिंसार पनाड, शुद्धोधन सरदार, सागर आत्माराम पनाड आदिंसह ग्रामस्थांवर जबाबदारी सोपवित वातावरण शांत करण्यात आले असुन मेहकर पोलीस परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.