
वर्धा : पोलिस पाटलांची गावातील नागरिकांचे आपापसातील वाद मिटविण्यासाठी समन्वयकांची चांगली भूमिका बजावण्यासोबतच प्रशासकीय कामात गावपातळीवर विविध योजना राबविण्यासाठी मोठी मदत होत आहे. यासाठी शासन सदैव त्यांच्या पाठीशी आहे, असे प्रतिपादन राज्याचे गृह निर्माण, गृह (ग्रामीण), शालेय शिक्षण, सहकार व खनीकर्म राज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी जिल्हास्तरीय पोलिस पाटील मेळावा व मार्गदर्शन शिबिरात केले.