
मूल : पोलिसांनी कोंबड बाजारावर छापा टाकला. हा कोंबडा बाजार पोंभूर्णा तालुक्यातील चकफुटाणा येथे सुरू होता.यात तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. दहा आरोपी फरार झाले.घटनास्थळावरून पोलिसांनी काळी पिवळी वाहनासह मोटार सायकली,पाच कोंबडे, वीस लोखंडी धारदार कात्या, रोख रक्कम असा एकूण सात लाख २४ हजार ७०० रुपयांचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी तेरा आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी घडली.