
वर्धा : या पेट्रोल हल्ल्यासाठी आरोपीची बऱ्याच दिवसांपासून तयारी सुरू होती. आरोपी अतिशय चलाख असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. शनिवारी (ता. 8) त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्याच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी पोलिसांकडून करण्यात येणार आहे.
सबळ पुराव्यांमुळे तो सुटणे शक्य नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.पेट्रोलच्या जळण्यामुळे काय त्रास होतो, याचा त्याने अभ्यास केल्याचे त्याच्या बोलण्यातून स्पष्ट होत असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी आतापर्यंत घटनास्थळावर सापडलेली पेट्रोलची शिशी, दुचाकी, कपडे, जाळण्यासाठी वापरलेला टेंभा आणि काही महत्त्वाचे साहित्य जप्त केले.
भल्यापहाटे नेले घटनास्थळी
आरोपीला घटनास्थळी नेत पंचनामा करणे कायद्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. आरोपीला भरदिवसा नेल्यास जनआक्रोश पाहता मोठा अनर्थ होण्याची शक्यता होती. त्यामुळे पोलिसांनी या परिसरातील नागरिक साखरझोपेत असताना त्याला घटनास्थळी नेत पंचनामा केल्याचे पुढे आले.
कोणाबद्दलच विचारणा नाही
आरोपीच्या पत्नीची नुकतीच प्रसूती झाली. त्याला 10 ते 12 दिवसांची मुलगी आहे. त्यांच्याबद्दलची साधी विचारणाही आरोपीकडून करण्यात आलेली नाही. आई-वडिलांबाबतही त्याने पोलिसांकडून माहिती घेतली नाही.
वर्धा : हिंगणघाट येथे पेट्रोल टाकून पेटवून दिल्याच्या घटनेत गंभीररीत्या जळालेल्या प्राध्यापक युवतीवर नागपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पीडितेच्या उपचाराकरिता आणखी 11 लाख रुपये शासनाकडून मंजूर करण्यात आले. यापूर्वी, शासनातर्फे रुग्णालयात चार लाख रुपये जमा करण्यात आले होते.
व्हिडिओ पाहा : Video : आता देता येणार जेवण; मात्र प्रकृती धोक्याबाहेर नाही
पीडितेवरील उपचाराकरिता जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी शासनाकडे दोनवेळा प्रस्ताव पाठवून निधीची तरतूद करून घेतली. पीडितेला नागपूर येथील ऑरेंज सिटी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाल्यावर जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी रुग्णालय प्रशासनाला फोन केला. मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून पैसे रुग्णालयाच्या खात्यात जमा करण्यात येईल. तोपर्यंत उपचार थांबवू नये. तसेच पीडित तरुणीच्या कुटुंबाकडून उपचारासाठी पैसे न घेण्याची विनंती केली.
त्यांनी लगेच रुग्णालय प्रशासनाकडून खर्चाचा अंदाज घेऊन पहिल्यांदा चार लाखांचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला. त्यासाठी मुख्यमंत्री कार्यालय, मुख्यमंत्र्यांचे सचिव आणि विशेष कार्य अधिकारी यांच्याशी सतत संपर्क साधला. त्यामुळे चार लाखांचा निधी रुग्णालयाच्या खात्यात जमा झाला.
उपचारासाठी आणखी निधी
पीडितेची प्रकृती गंभीर असून, उपचारासाठी आणखी निधी लागू शकतो, असे रुग्णालयाकडून कळविताच जिल्हाधिकाऱ्यांनी दुसरा प्रस्तावही शासनाकडे पाठविला. त्यानुसार 11 लाख रुपयांचा निधी शासनाने मंजूर केला. जिल्हाधिकारी भीमनवार यांनी पीडित कुटुंबीयांच्या निवास, भोजन आणि वाहनाची व्यवस्थासुद्धा करून दिली आहे. पीडितेवर योग्य उपचार व्हावे, याकरिता शासनाने मुंबईतील बर्न इन्स्टिट्यूटमधील डॉक्टरांची एक चमूसुद्धा पाठविली आहे.
निर्भया फंडातून सात लाख मिळण्याची अपेक्षा
पीडितेला जास्तीत जास्त मदत व्हावी, यासाठी निर्भया फंडातून मदत मिळवून देण्याकरिता जिल्हा विधी सेवा प्राधिकरणची बैठक जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. त्यातून पीडितेला सात लाख रुपयांपर्यंत मदत मिळू शकते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.