
साकोली ( जि. भंडारा) : तालुक्यातील परसोडी घाटातून अवैधरीत्या वाळूची चोरी करणाऱ्या चार ट्रॅक्टर चालक-मालकावर साकोली पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई मंगळवारी ( ता. २४) केली. आरोपींकडून १९ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.