Gondia Accident: आमदार फुकेंच्या ताफ्यातील वाहनाची दुचाकीला धडक; चालकाचा मृत्यू, हिरडामाली येथील घटना, काही काळ तणाव

Accident News: गोंदियाच्या गोरेगाव-गोंदिया राज्य मार्गावर आमदार डॉ. परिणय फुके यांच्या ताफ्यातील पोलिस वाहनाने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीचालक अरविंद चव्हाणचा मृत्यू झाला.
Gondia Accident
Gondia Accidentsakal
Updated on

गोरेगाव (जि. गोंदिया) : गोरगावकडून गोंदियाच्या दिशेने जाणाऱ्या आमदार डॉ. परिणय फुके यांच्या ताफ्यातील पोलिस वाहनाने दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीचालकाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (ता. १९) सकाळी दहाच्या सुमारास गोंदिया-कोहमारा राज्य मार्गावरील हिरडामाली येथे घडली. अरविंद पन्नालाल चव्हाण (वय ३६, रा. महाजनटोली,गोरेगाव) असे मृताचे नाव आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com