राज्याचे राजकारण गढूळ : ज्येष्ठ पत्रकार भावे

सकाळ वृत्तसेवा
Monday, 19 August 2019

नागपूर  : सकाळी एका पक्षात असलेला राजकीय कार्यकर्ता संध्याकाळी दुसऱ्याच पक्षात दिसतो. विचार, तत्त्व, मूल्य हद्दपार झाल्याचे चित्र आहे. जुन्या नेत्यांकडे सेवाभाव, समर्पण, त्याग असल्याने त्यांनी राष्ट्र संकल्पना रुजविली. यात शोकांतिका म्हणजे त्या काळातला हिशेब आज मागितला जात आहे. ज्यांना त्या काळातील परिस्थितीची जाण नाही, असे लोक सवाल करतात. राज्याचे राजकारण गढूळ होत असल्याची टीका ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी केली.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे स्व. शंकरराव चव्हाण, स्व. राजाराम बापू व स्व. अण्णा भाऊ साठे या तीन सुपुत्रांच्या जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त धनवटे सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी वनराईचे विश्‍वस्त गिरीश गांधी होते. मंचावर सागर खादीवाले, अनंत घराड, चंद्रकांत वानखेडे, श्रीकांत बेले, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे, उमाशंकर अग्निहोत्री उपस्थित होते. भावे म्हणाले, राज्यात या तिन्ही महानुभावांची जन्मशताब्दी साजरी होत आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात डोकावून पाहिल्यास माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण, वसंतदादा पाटील व विलासराव देशमुख चार खांबावर राज्य उभे असल्याचे दिसेल. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी समृद्ध महाराष्ट्र घडविण्यासाठी दूरदृष्टीने प्रयत्न केले. तीच परंपरा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आपापल्या परीने जोपासली. लोकहितासाठी त्यांनी राजकीय द्वेष बाजूला ठेवला. हे त्यांचे मोठेपण होते. विचार, व्यवस्था, परिवर्तन यांचा सातत्याने विचार करणारी ही सर्व समाजकारणी मंडळी होती. त्यांचा आदर्श आजच्या नेत्यांनी घेण्याची गरज आहे. राज्यात सर्वाधिक 35 मोठी धरणं शंकरराव चव्हाण यांनी बांधली. खऱ्या अर्थाने अर्ध्या महाराष्ट्राची तहान त्यांनी भागवली. शंकरराव चव्हाण यांचे म्हणणे तत्कालीन प्रमुखांनी ऐकले असते तर कदाचित शीख दंगली आणि बाबरी विद्‌ध्वंस झाला नसता, असे त्यांनी सांगितले. प्रास्तावित चंद्रकांत वानखेडे यांनी केले. संचालन कोमल ठाकरे यांनी केले.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Political politics in the state: senior journalist Bhave