esakal | वाचवा, वाचवाऽऽ मला मरायचे नाही; नामफलकाला लावला गळफास
sakal

बोलून बातमी शोधा

वाचवा, वाचवाऽऽ मला मरायचे नाही;  नामफलकाला लावला गळफास

वाचवा, वाचवाऽऽ मला मरायचे नाही; नामफलकाला लावला गळफास

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वर्धा : प्रकल्पासाठी जमिनी घेतल्या मात्र मोबदला दिला नाही. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात अनेकदा आंदोलन केले. त्याचा काहीच उपयोग झाला नाही. यामुळे शुक्रवारी (ता. १६) प्रहारच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन करण्यात आले. यावेळी पीडित शेतकऱ्याने ‘मला मरायचे नाही वाचवा’ असे फलक घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात प्रेरणा देशभ्रतार यांच्या नामफलकाला बांधून गळफास लावून प्रतीकात्मक आंदोलन केले. (Prahar's-agitation-in-Wardha-district-nad86)

निम्न वर्धा, नवरगाव येथून अनेकांचे पुनर्वसन करण्यात आले. हे पुनर्वसन म्हणजे वेठबिगारीचे जीवन असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. समस्या मार्गी काढण्यासाठी लाभार्थ्यांनी अनेकवार निवेदने दिली. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार सर्वच कागदांची पूर्तता केली. परंतु, त्याचा काहीच लाभ झाला नाही. ही समस्या आजची नसून अनेक वर्षांची आहे. याकडे लक्ष देण्यासाठी कोणालाही वेळ नसल्याने हे आंदोलन करण्यात येत असल्याचे प्रहारचे विका दांडगे यांनी सांगितले.

हेही वाचा: ‘...अन्यथा तुझ्या शरीराचे चार तुकडे करून चार राज्यात फेकून देईल’

जिल्हाधिकारी कार्यालयात कोणाच्या ध्यानी मनी नसताना प्रहारचे कार्यकर्ते अचानक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आले. त्यानी दिलेल्या प्रशासनाविरोधी नाऱ्यांमुळे जिल्हाधिकारी कार्यालय दणाणून गेले. कर्तव्यावर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांची चांगली तारांबळ उडाली. आंदोलनकर्त्यांना पोलिस प्रशासनाच्या वतीने स्थानबद्ध करण्यात आले.

आंदोलनकर्त्यांवर बळजबरी

जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन करताना पोलिस प्रशासनाकडून आंदोलकांवर बळजबरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी मागण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्याच्या कक्षात चर्चा सुरू असतानाच पोलिसांनी बाहेर उभ्या असलेल्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. जिल्हा प्रशासनाकडून आंदोलकांवर करण्यात आलेल्या दडपशाहीचा निषेध नोंदविण्यात आला.

(Prahar's-agitation-in-Wardha-district-nad86)

loading image