esakal | प्रेम झाडेंनी स्वीकारली नगराध्यक्षपदाची सुत्रे
sakal

बोलून बातमी शोधा

वाडी ः प्रेम झाडे यांनी नगराध्यक्षपद स्वीकारताच अभिनंदन करताना समर्थित पदाधिकारी.

प्रेम झाडेंनी स्वीकारली नगराध्यक्षपदाची सुत्रे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वाडी (जि.नागपूर) : विकासकार्यात सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन काम करण्याची प्रतिक्रिया व्यक्‍त करीत प्रेम झाडेंनी नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. नागपूर उच्च न्यायालयाच्या दिशानिर्देशानुसार नगराध्यक्षपदाच्या पदग्रहण समारंभाची जबाबदारी उपमुख्याधिकारी आकाश सहारे यांनी पार पाडली. आकाश सहारे व प्रभारी नगराध्यक्ष राजेश थोराने यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
प्रभारी अध्यक्ष राजेश थोराने यांनी न्यायालयाच्या आदेशानुसार नगराध्यक्षपदाचा कार्यभार हस्तांतरित केला. राष्ट्रवादीचे नगरसेवक राजेश जयस्वाल, श्‍याम मंडपे, भाजपच्या नगरसेविका नीता कुणावार, अभय कुणावार, बसपच्या अस्मिता मेश्राम, मंगला वाघमारे, प्रज्ञा वासनिक, आशीष नंदागवळी, राष्ट्रवादीचे दिलीप दोरखंडे, राजेश जिरापुरे, शिवसेना हिंगणा विधानसभा सहसंपर्क प्रमुख दिवाकर पाटणे, तहसील प्रमुख संजय अनासाने, रूपेश झाडे, प्रा. मधू मानके, कॉंग्रेसचे आशीष पाटील, जेम्स फ्रान्सिस, संजय पिसे, जुनघरेंसह अनेक सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.
नगराध्यक्षपदासाठी इतरांचा हिरमोड
13 सप्टेंबरला होऊ घातलेल्या निवडणुकीवर न्यायालयाच्या स्थगिती आदेशावरून नगराध्यक्षपदाचे बाशिंग बांधून बसणाऱ्यांचे मनसुबे धुळीस मिळाले. न्यायालयाने 13 सप्टेंबरच्या निवडणुकीवर बंदी घातली. बुधवारी झाडेंनी चौथे नगराध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला. 5 सप्टेंबरला कोर्टात सुनावणी होणार आहे. आमदार समीर मेघे यांना कोर्टाने दिलेल्या स्थगितीमुळे मोठा धक्का बसला आहे. पक्षांतर्गत कलहामुळे प्रेम झाडे यांना नगराध्यक्ष पदावरून हटविण्यात आमदार यशस्वी झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात गाजत आहे. 13 सप्टेंबर रोजी होणाऱ्या नगराध्यक्षपदासाठी भाजपतर्फे दोन उमेदवारी अर्ज भरण्यात आले होते. त्यामुळे भाजपमध्ये दोन गट तयार झाल्याचे चित्र निर्माण झाले होते. भाजपच्या समीर मेघे गटाचे केशव बांदरे, कैलास मंथापूरवार तर झाडे गटाच्या नीता कुणावार, बहुजन समाज पक्ष समर्थित आशीष नंदागवळी यांनी अर्ज दाखल केले होते. परंतु वेळीच प्रेम झाडेंनी निवडणुकीवर स्थगिती आणून पुन्हा वाडी नगर परिषदेवर कब्जा मिळविला

loading image
go to top