esakal | प्रेमनाथ झाडेंच्या अपात्रतेला स्थगिती
sakal

बोलून बातमी शोधा

प्रेमनाथ झाडेंच्या अपात्रतेला स्थगिती

प्रेमनाथ झाडेंच्या अपात्रतेला स्थगिती

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा
नागपूर : वाडी नगर परिषदेचे अध्यक्ष प्रेमनाथ झाडे यांच्या अपात्रतेला हायकोर्टाने स्थगिती दिली. न्या. झेड. ए. हक यांच्या आदेशामुळे झाडे यांना दिलासा मिळाला आहे. मागील सुनावणीत वाडी. न. प. स्थायी समितीच्या निवडणुकीला हायकोर्टाने स्थगिती दिली होती. याच आदेशात वाडी न. प.चे गट नेते झाडे यांना पदावरून काढण्याबाबत देण्यात आलेल्या आदेशालाही स्थगिती दिली होती.
भाजपच्या तिकिटावर प्रेमनाथ झाडे निवडून आले होते. त्यांना राज्यमंत्र्यांनी अपात्र घोषित केले होते. 2015 मध्ये वाडी न. प. च्या झालेल्या निवडणुकीत निवडून आलेल्या उमेदवारांनी वाडी नगरविकास आघाडी गट स्थापन केला. या गटनेतेपदी झाडे यांची नियुक्ती करण्यात आली. व्हिप काढण्याचा अधिकार झाडे यांना होता. परंतु आघाडीचे सदस्य बांदरे यांना कोणताही अधिकार नसताना त्यांनी पत्र काढून मीटिंग बोलविली. या मीटिंगमध्ये झाडे यांना गटनेतेपदावरून काढण्याचे ठरविण्यात आले. यानंतर बांदरे यांनी मुख्याधिकाऱ्यांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना झाडे यांना गट नेतेपदावरून काढण्यासाठी अर्ज केला. जिल्हाधिकाऱ्यांनी झाडे यांची बाजू ऐकून घेतली नाही. तसेच त्यांना सुनावणीची कोणतीही संधी दिली नाही. झाडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाविरुद्ध हायकोर्टात रिट याचिका दाखल केली. हायकोर्टाने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला स्थगिती दिली होती. प्रेमनाथ झाडे यांच्यातर्फे ऍड. फिरदोस मिर्झा, ऍड. तेजस देशपांडे, ऍड. अल्पेश देशमुख, वाडी.न. प. तर्फे ऍड. महेश धात्रक यांनी बाजू मांडली.
loading image
go to top