“सानिका तुझ्या शिक्षणाची जबाबदारी माझ्याकडे” थेट विधान भवनातून आला फोन आणि तिला बसला आश्चर्याचा धक्का.. 

सूरज पाटील
Friday, 31 July 2020

संस्कृत विषयाचा अभ्यास करीत असतानाच दु:खद वार्ता तिला कळली. या काळात मराठी कवितांनी तिला आधार दिला. तिच्या डोळ्यापुढे एकाएकी अशोक थोरात यांची कविता आली. एकएक ओळ ती आठवत अश्रूंना रोखू लागली. “वेदना झाल्या तरीही अश्रू गाळणार नाही”, असा मनोमन निश्‍चय तिने केला. 

यवतमाळ : आपल्या मुलीने डॉक्टर व्हावे, असे स्वप्न तिच्या वडिलांनी बघितले. दहावीत चांगले गुण मिळवायचे, म्हणून सानिका अभ्यासात मग्न असायची. तर, सततची नापिकी व कर्ज कसे फेडायचे, ही विवंचना सुधाकर पवार यांना स्वस्थ बसू देत नव्हती. सहा मार्चला त्यांनी विहिरीत उडी घेऊन जीवनयात्रा संपविली. 

संस्कृत विषयाचा अभ्यास करीत असतानाच दु:खद वार्ता तिला कळली. या काळात मराठी कवितांनी तिला आधार दिला. तिच्या डोळ्यापुढे एकाएकी अशोक थोरात यांची कविता आली. एकएक ओळ ती आठवत अश्रूंना रोखू लागली. “वेदना झाल्या तरीही अश्रू गाळणार नाही”, असा मनोमन निश्‍चय तिने केला. 

हेही वाचा - 'माझ्याकडे लग्नाचा पुरावा आहे, तुझे लग्न दुसऱ्यासोबत होऊ देणार नाही' अस म्हणत केला अत्याचार...

दुःख बाजूला ठेऊन दिली परीक्षा 

संस्कृतचा पेपर द्यायला परीक्षा केंद्रावर गेली. वडिलांचा चेहरा आठवत जड अंतकरणाने पेपर दिला. बुधवारी (ता.29) दुपारी निकाल आला. ग्रामीण भागात सुविधांचा अभाव असताना गुणी लेकीने दहावीत 97. 60 टक्के गुण मिळविले. विशेष म्हणजे संस्कृत विषयात शंभर पैकी शंभर गुण मिळाले आहे. 

थेट विधान भवनातून आला फोन

सानिका सुधाकर पवार असे गुणवंत विद्यार्थिनीचे नाव असून, यवतमाळ तालुक्यातील हिवरी येथील रहिवासी आहे. वडार समाज तसाही शिक्षणापासून दूरच. त्यात कौतुकाची थाप मारण्यासाठी बाबा नाही, याचे शल्य तिला सारखे बोचते आहे. शिक्षण घेऊन तिला डॉक्टर व्हायचे आहे आणि प्रशासकीय सेवेत जाऊन शेतकर्‍यांसाठी ठोस उपाययोजना करावयाच्या आहेत. सानिकाला थेट मुंबई येथील विधानभवनातून फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीचे नाव ऐकून तिला धक्काच बसला. 

जाणून घ्या - आम्हालाही क्वारंटाइन करा असे विनंतीपत्र दंत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी का दिले जाणून घ्या...

नेमका कोणाचा होता फोन 

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावरच आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून जिल्ह्यातील शेतकरी, त्यांच्या समस्यांची विशेष नाळ जुळली आहे. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलीला मिळालेल्या यशाची माहिती मिळताच त्यांनी थेट विधानभवनातून फोन केला. “हैलो सानिका, अभिनंदन बेटा, दहावीत किती टक्के गुण मिळाले. कौटुंबिक परिस्थितीबाबत विचारणा करीत मी यवतमाळ जिल्ह्यात येताच हिवरी येथील घरी येऊन भेट घेणार. पुढील शिक्षणाच्या वाटचालीसाठी मदत करण्याचे आश्‍वासन दिले. कुटुंबाचा आधारवड नसताना स्वत: फोन करून मदतीच्या आश्‍वासनामुळे सानिकाला पुन्हा लढण्याचे बळ मिळाले आहे.
 

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: President of legislative assembly of maharashtra nana patole took all expanses of education of poor girl