

नवेगावबांध : दुचाकीने जात असताना शर्टच्या खिशात असलेल्या मोबाईलचा स्फोट होऊन एका मुख्याध्यापकाचा जागीच मृत्यू; तर दुचाकीच्या मागे बसलेली व्यक्ती जखमी झाली. ही घटना शुक्रवारी (ता. ६) सायंकाळी ६.४५ च्या सुमारास सिरेगावबांध ते सानगडी मार्गावरील केसलवाडा फाट्याजवळ घडली.