एक प्रश्न विचारताच कैद्याचा चक्क तुरुंग अधिकाऱ्यावर हल्ला, यवतमाळ कारागृहातील घटना

the prisoner attacked the prison officer in yavatmal
the prisoner attacked the prison officer in yavatmal

यवतमाळ : खुनाच्या आरोपात अटक असलेल्या कैद्याने थेट तुरुंग अधिकाऱ्यावर हल्ला चढवीत मारहाण केली. ही घटना मंगळवारी (ता. एक) सकाळी साडेदहाच्यादरम्यान येथील जिल्हा कारागृहात घडली. त्यामुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.

सोहेल शेख हे तुरुंग अधिकारी श्रेणी दोन जिल्हा कारागृहात कार्यरत आहेत. मंगळवारी सकाळी बराकीची पाहणी करीत असताना त्यांनी खुनाच्या गुन्ह्यात कारागृहात असलेल्या शिनू नामक कैद्याला केस असे का कापले? असा जाब विचारला. त्यामुळे संतापलेल्या कैद्याने तुरुंग अधिकारी शेख यांच्यावर हल्ला चढविला. त्यामुळे इतरही कैद्यांनी गोंधळ घालणे सुरू केल्याने घटनचे गांभीर्य ओळखून सायरन वाजविण्यात आले. आवाज ऐकून यवतमाळ शहर पोलिस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी कारागृहात धडकले. त्यानंतर वातावरण निवळले. शिनू याच्यावर खुनासह इतरही गुन्हे दाखल आहेत. यापूर्वीदेखील त्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली. याप्रकरणी अवधूतवाडी पोलिस ठाण्यात वृत्तलिहिस्तोवर गुन्हा नोंदविण्यात आला नव्हता. अधिक माहितीसाठी कारागृह अधीक्षक कीर्ती चिंतामणी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.

सायरनचा आवाज येताच अधिकाऱ्यांची धाव -
सायरनचा आवाज येताच यवतमाळ शहराचे ठाणेदार धनंजय सायरे यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेची माहिती वरिष्ठांना देण्यात आली. अपर पोलिस अधीक्षक खंडेराव धरणे, उपविभागीय पोलिस अधिकारी माधुरी बाविस्कर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रदीप शिरस्कर, अवधूतवाडीचे ठाणेदार आनंद वागतकर आदींनी कारागृहात भेट दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com