अमरावती - कारागृहात अनेक बंदी शिक्षा भोगत असून त्यांची मुले आईवडिलांच्या प्रेमापासून, त्यांच्या स्पर्शापासून वंचित राहतात. त्यामुळे त्यांची भेट व्हावी व संवाद साधता यावा, यासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात आप्तस्वकियांच्या भेटीने बंदीजनसुद्धा गहिवरल्याचा प्रसंग अनेकांनी अनुभवला.
कारागृह व सुधारसेवा विभागाच्या अपर पोलिस महासंचालक डॉ. जालिंदर सुपेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी (ता. तीन) अमरावती मध्यवर्ती कारागृहामध्ये बंदींसाठी गळाभेट कार्यक्रम आयोजित करण्यात आला.