जीवनाची 'आशा' नेहमी दुर्लक्षितच; विविध मागण्या शासनदरबारी प्रलंबित

जीवनाची 'आशा' नेहमी दुर्लक्षितच; विविध मागण्या शासनदरबारी प्रलंबित
Updated on

अमरावती : सर्दी (Cold), ताप (Fever), खोकला (Cough), वास न येणे (Loss of smell), तोंडाला चव (loss of taste) आहे की नाही, या सर्व लक्षणांची माहिती गावोगावी फिरून आरोग्य विभागाला (health department) कळवून सर्वसामान्यांना कोविडपासून संरक्षण देणाऱ्या आशासेविका (Asha workers) तसेत गटप्रवर्तकांना मात्र आजही शासनाच्या कृपेची प्रतीक्षा आहे. आशासेविकांच्या मूलभूत मागण्यांकडे शासन दुर्लक्ष करीत असल्याने कोविड मोहिमेवर (Covid virus) परिणाम होण्याची शक्‍यता आहे. (Problems are Asha workers are still pending at government)

जीवनाची 'आशा' नेहमी दुर्लक्षितच; विविध मागण्या शासनदरबारी प्रलंबित
हे आहेत जगातील काही मनमोहक धबधबे; बघून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

राज्यात 67 हजार आशा व साडेतीन हजार गटप्रवर्तक महिला आहेत. एक हजार लोकसंख्येमागे एक आशा, अशाप्रकारे काम सुरू आहे. विशेष म्हणजे कोविडच्या रुग्णांबाबतची संपूर्ण माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्याची जबाबदारी आशांवर सोपविण्यात आली आहे. हे एक राष्ट्रीय कर्तव्य समजून आशासेविका या गावोगावी, घरोघरी फिरून, कोविडच्या या धोकादायक काळातसुद्धा आपले काम इमानेइतबारे करीत आहेत.

घराघरात जाऊन सर्दी, ताप, खोकला, वास न येणे, चव न येणे, ऑक्‍सिजनची मात्रा तपासणे, नागरिकांची नावे, पत्ता यासर्व बाबींची माहिती गोळा करून ती वैद्यकीय अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वाचे कार्य मागील दीड वर्षापासून करीत आहेत. विशेष म्हणजे 60 वर्षांवरील व अतिगंभीर रुग्णांची यादी तपशिलासह तयार करण्याची जबाबदारीसुद्धा आशांवर टाकण्यात आली आहे. असे असले तरी आशांना कुठल्याही प्रकारचा वाढीव प्रोत्साहनभत्ता दिला जात नाही.

दरमहा केवळ एक हजार रुपये त्यांना मानधन म्हणून दिले जात आहे. अनेक आशांच्या कुटुंबातून काम सोडण्याबाबत दबावसुद्धा येत आहे. गटप्रवर्तकांना तर केवळ 500 रुपयेच मानधन दिले जात आहे. ही एकप्रकारे वेठबिगारी असल्याचा आरोप आशासेविकांनी केला आहे.

जीवनाची 'आशा' नेहमी दुर्लक्षितच; विविध मागण्या शासनदरबारी प्रलंबित
आईने बाळाला स्तनपान करावे की नाही ?
आशासेविका तसेच गटप्रवर्तक महिलांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्याची मुख्य मागणी महाराष्ट्र राज्य आशा कृृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे. मागणीच्या पूर्ततेकरिता 16 जून ही डेडलाइन देण्यात आली असून त्यानंतर मात्र कोविड संदर्भातील कामांवर राज्यातील सर्व आशासेविका बहिष्कार टाकतील.
-प्रफुल्ल देशमुख, जिल्हा सचिव, आशा व गटप्रवर्तक संघटना (आयटक)

(Problems are Asha workers are still pending at government)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com