esakal | इटियाडोहात केज कल्चर प्रोजेक्‍टच्या माध्यमातून तेलापी मासोळीची निर्मिती
sakal

बोलून बातमी शोधा

इटियाडोह धरणात केज कल्चर प्रोजेक्‍ट तयार करण्यात आला आहे.

इटियाडोहात केज कल्चर प्रोजेक्‍टच्या माध्यमातून तेलापी मासोळीची निर्मिती

sakal_logo
By
संतोष रोकडे

अर्जुनी मोरगाव (जि. गोंदिया) : पूर्व विदर्भातील शेवटच्या टोकावर असलेल्या अर्जुनी मोरगाव तालुक्‍यातील इटियाडोह धरण हे शेती सिंचन व मत्स्य व्यवसायासाठी प्रसिद्ध आहे. धरणात विविध प्रजातीच्या मासोळ्या आहेत. या धरणात तेलापी प्रजातीच्या मासोळीचे उत्पादन घेतले जाते. सोबतच झिंग्याचेही उत्पादन घेतले जाते. तेलापी मासोळीच्या निर्मितीसाठी इटियाडोह धरणाच्या पाण्यात केज कल्चर प्रोजेक्‍ट तयार करण्यात आला आहे.
उंच पहाड व निसर्गाच्या कुशीत बांधलेला इटियाडोह धरण अर्जुनी मोरगाव तालुक्‍याचा भूषण म्हणून ओळखला जातो. सन 1965 मध्ये माती व दगडी भरावाने तयार करण्यात आलेल्या महाराष्ट्रातील या धरणावर निसर्गाने सौंदर्याची मुक्तहस्ते उधळण केली आहे. या धरणातील पाण्याचे भंडारा, गोंदिया व गडचिरोली जिल्ह्यातील शेतीला सिंचन होते. तसेच मासेमारीसाठीसुध्दा हे धरण प्रसिद्ध आहे. या धरणात "इटियाडोह जलाशय मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था रामनगर'च्या माध्यमातून केज कल्चर प्रोजेक्‍ट तयार करण्यात आला आहे. या प्रोजेक्‍टच्या माध्यमातून पिंजरा पद्धतीने मत्स्यउद्योग केला जातो. या प्रकल्पात बीज उत्पादन तयार करून तेलापी प्रजातीची मासोळी उत्पादित केली जाते. तेलापी मासोळीची वाढ दीडकिलो वजनापर्यंत होते. खाण्यासाठी अत्यंत चविष्ट असल्याने या मासोळीची मागणी मोठ्या प्रमाणात होत असल्याची माहिती आहे. याच धरणात बाहेरून बीज आणून व त्यावर प्रक्रिया करून झिंग्याचे उत्पादनसुद्धा घेतले जाते. उत्पादित केलेला झिंगा 250 ते 300 ग्राम वजनाचा होतो. येथील झिंगा चविष्ट असल्याने मोठ्या प्रमाणात त्याची मागणी होते. धरणात विविध प्रजातीचे मासेसुद्धा उपलब्ध होत आहेत.

loading image
go to top