राज्यात दहा टक्केच शाळांचे प्रोफाइल तयार

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नागपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे राज्यातील माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयांचे नवे प्रोफाइल तयार करण्यास महिन्याभरापासून सुरुवात झाली. मात्र, महिन्याभरात राज्यातील केवळ दहा टक्के शाळांनी प्रोफाइल तयार केले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये नागपूर विभागातील सर्वाधिक शाळांनी प्रोफाइल तयार केले आहे.

राज्यातील मंडळाशी संलग्न असलेल्या शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांची अद्ययावत माहिती देताना बऱ्याच अडचणी येतात. अनेकदा जुनीच माहिती अपडेट केली जाते. त्यामुळे राज्य मंडळाने आता दहावी-बारावी शाळांचे नवे प्रोफाइल तयार केले जाणार आहे. शाळांनी सद्य:स्थितीतील माहिती ऑनलाइन भरावयाच्या सूचना दिल्या. संपूर्ण सप्टेंबर महिन्यात हे कामकाज करायचे आहे. यातूनच दहावी आणि बारावीचे प्रोफाइल तयार करायचे होते. मात्र, 22 तारखेपर्यंत माध्यमिक शाळांचे 6 हजार 239 आणि कनिष्ठ महाविद्यालयांपैकी नऊ विभागांतून 1 हजार 815 महाविद्यालयांनी प्रोफाइल तयार केले. राज्यातील शाळांची संख्या बघितल्यास ही संख्या दहा टक्के आहे. त्यामुळे सप्टेंबरच्या शेवटपर्यंत खरोखरच राज्यातील संपूर्ण शाळांचे प्रोफाइल तयार होईल काय, हा प्रश्‍न आहे. मात्र, यातही दोन्ही गटांत नागपूरने आघाडी मिळवीत सर्वाधिक एक हजारावर शाळांनी प्रोफाइल तयार केले आहे.

हे राहणार प्रोफाइलमध्ये
प्रोफाइलमध्ये शाळा, शाळा प्रशासन, इमारती, विद्यार्थिसंख्या, परीक्षा आसन व्यवस्था, शाळेने नियुक्त केलेले शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची माहिती, नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांची संख्या, नववी व दहावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना शिकविणाऱ्या शिक्षकांची संख्या, या माहितीबरोबरच शाळेतील मागील तीन वर्षांचा निकाल देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. परीक्षा मंडळाने नियुक्त करण्यात आलेल्या परीक्षकांची व नियमांची माहिती व बॅंक डिटेल्स ही याद्वारे मंडळाकडे उपलब्ध होणार आहेत. यूडायस आयडी, ओटीपी, पासवर्ड यांसारख्या आधुनिक प्रणाली वापरल्यामुळे ही माहिती कायमस्वरूपी राहणार आहे.
विभाग कनिष्ठ महाविद्यालये
अमरावती - 239
औरंगाबाद - 90
कोकण - 65
कोल्हापूर - 270
नागपूर - 290
नाशिक -206
पुणे -241
मुंबई -206
लातूर - 208
एकूण -1815

माध्यमिक विभागातील शाळा
लातूर - 674
नाशिक - 790
औरंगाबाद - 231
मुंबई - 857
नागपूर - 781
कोल्हापूर - 1,261
अमरावती - 682
कोकण - 245
पुणे - 718
एकूण - 6239

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com