तहसील कार्यालयात ५८ लाभार्थ्यांना १३ लाख ८९ हजाराचे वितरण

विवेक मेटकर
गुरुवार, 3 मे 2018

अकाली पाऊस आणि वादळामुळे क्षतीग्रस्त झालेल्या घरांच्या नुकसानाचा मोबदला म्हणून १३ लाभार्थ्यांना ४ लाख ८९ हजार रुपयांच्या मदतीचे धनादेश स्वरुपात तहसील कार्यालयातील नैसर्गिक आपत्ती शाखेच्या वतीने वितरण करण्यात आले.

अकोला: मूर्तिजापूर तालुक्यातील ५८ क्षतीग्रस्त कुटुंबांना येथील तहसील कार्यालयामार्फत १३ लाख ८९ हजार रुपयांच्या मदतीचे धनादेशाद्वारे आज माहाराष्ट्र दिनाच्या पर्वावर आमदार हरीश पिंपळे यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.

उपविभागीय आधिकारी भागवत सैदाणे, तहसीलदार राहुल तायडे, बीडीओ, पोलीस निरिक्षक अव्हाळे, पचायत समितीचे उपसभापती उमेश मडगे, राजु सदार, पं.स. सदस्य सौदागर खंडारे, नायब तहसीलदार आर.बी.दाबेराव, बनसोड, खान व पल्लडवार यावेळी प्रमुख आतिथी म्हणून उपस्थित होते. 
अकाली पाऊस आणि वादळामुळे क्षतीग्रस्त झालेल्या घरांच्या नुकसानाचा मोबदला म्हणून १३ लाभार्थ्यांना ४ लाख ८९ हजार रुपयांच्या मदतीचे धनादेश स्वरुपात तहसील कार्यालयातील नैसर्गिक आपत्ती शाखेच्या वतीने वितरण करण्यात आले.

राष्ट्रीय कुटुंब आर्थसहाय्य योजनेंतर्गत प्रमुख कमावती व्यक्ती मरण पावलेल्या ४५ कुटुंबांना प्रत्येकी २० हजार रुपये, असे एकूण ९ लाख रुपयांचे धनादेश वितरीत करण्यात आले. 

शासन स्तरावरील सर्व योजनांचा लाभ जनसामान्यांपर्यंत पोचविण्यासाठी शासन कटीबद्ध आहे. प्रशासनही त्यासाठी अनुकूल आहे. येथील माहसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना सामाजिक बांधिलकीची जाण आहे, सामान्य जनतेप्रती कळवळा आहे, असे प्रतिपादन यावेळी बोलतांना आमदार पिंपळे यांनी केले. तहसीलदार राहुल तायडे यांनी सर्वांचे आभार मानले. आमदारांचे कार्यालयीन मंत्री सुधीर दुबे, तहसील व उप विभागीय अधिकारी कार्यालयाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Program at tahasil office Akola