esakal | प्रकल्पग्रस्तांचे खापरीच्या शेजारीच पुनर्वसन
sakal

बोलून बातमी शोधा

प्रकल्पग्रस्तांचे  खापरीच्या शेजारीच पुनर्वसन

प्रकल्पग्रस्तांचे खापरीच्या शेजारीच पुनर्वसन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा
नागपूर : मिहान प्रकल्पातील म्हाडाच्या ले-आउटमधील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन खापरी प्रकल्पग्रस्तांच्याच शेजारी करण्याचा निर्णय आज घेण्यात आला. गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या संदर्भात बैठक घेतली. त्यानंतर उपरोक्त निर्णय घेण्यात आला.
मिहान प्रकल्पांत असलेल्या म्हाडाच्या या जागेवर ज्यांना भूखंड मिळाले त्यांना भूखंडांचे पैसे दिले जाणार आहेत. ज्यांनी तेथे घरे बांधली, त्या नागरिकांना हजार चौरस फुटांचा भूखंड व घरासाठी पैसे देण्यात आले आहे. मिहानतर्फे या नागरिकांनी पुनवर्सन करण्यात येणार असल्याचे आजच्या बैठकीत ठरले. ही जागा म्हाडाने मिहान प्रकल्पासाठी हस्तांतरित केली आहे. पुनर्वसन संयुक्तरीत्या करण्यात येणार आहे. यापूर्वी खापरी येथे पालकमंत्री बावनकुळे यांनी आयोजित केलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या बैठकीतही ही जागा म्हाडा मिहानला हस्तांतरित करण्यास तयार असल्याची भूमिका म्हाडाने घेतली होती. त्यानुसार, ही जागा मिहानला हस्तांतरित करण्यात आली आहे. या बैठकीला एमएडीसीचे व्यवस्थापकीय संचालक सुरेश काकाणी, म्हाडाचे अपर मुख्य सचिव संजयकुमार, अतिरिक्त जिल्हाधिाकारी प्रकाश पाटील व अन्य उपस्थित होते.
loading image
go to top