Maharashtra vidhansabha 2019 : प्रचारसाहित्य छपाईपूर्वी प्रमाणित करून घेणे आवश्‍यक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 सप्टेंबर 2019

प्रचारसाहित्य छपाईपूर्वी प्रमाणित करून घेणे आवश्‍यक
नागपूर : जिल्ह्यातील राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी प्रचारादरम्यान वापरण्यात येणारे सोशन मीडियासह सर्व प्रकारचे प्रचार साहित्य छपाईपूर्वी माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीकडून प्रमाणित करून घ्यावे, अशी सूचना जिल्हाधिकारी अश्‍विन मुद्‌गल यांनी केली.

जिल्हाधिकारी कार्यालयात माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीची सोमवारी जिल्हाधिकारी अश्‍विन मुद्‌गल यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजलक्ष्मी शहा, निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र खजांजी, समिती सदस्य सचिव जिल्हा माहिती अधिकारी (विशेष कार्य) अनिल गडेकर, सदस्य गजानन जानभोर, महेश माखेजा, मोईज हक, आनंद अंबेकर, गौरी मराठे, शैलजा वाघ, अतुल भुसारी, धनंजय वानखडे उपस्थित होते.
निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार यांच्यामार्फत प्रचार साहित्याची छपाई मोठ्या प्रमाणात करून घेण्यात येते. प्रचार साहित्य छपाई करण्यापूर्वी माध्यम नियंत्रण व प्रमाणीकरण समितीमार्फत प्रमाणपत्र घेणे आवश्‍यक आहे. तसेच छपाईसंदर्भातील मजकूर या समितीमार्फत तपासणी करणे आवश्‍यक आहे. त्यानंतर प्रचार साहित्याची छपाई करावी व छपाई केलेल्या प्रतीची माहिती मुद्रणालयाच्या व्यवस्थापकाने जिल्हा नोडल अधिकारी आचार संहिता कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर तसेच माध्यम नियंत्रण कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय येथील कक्षात सादर करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी मुद्‌गल यांनी दिली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Promotional literature must be certified before printing