
चंद्रपूर - पंजाब राज्यातील एका गुन्ह्यात मोस्ट वॉटेन्ड असलेल्या एका आरोपीला स्थानिक पोलिस व गुप्तचर यंत्रणेच्या मदतीने अटक करण्यात आली. जसप्रीत सिंग (वय २०) असे या आरोपीचे नाव आहे. तो अमृतसर येथील पोलिस चौकीवर हँड ग्रेनेड फेकणारा वॉन्टेड खलिस्तानवादी असल्याची पोलिस सूत्रांची माहिती आहे. शुक्रवारी अत्यंत गुप्तपणे ही कारवाई करण्यात आली. यानंतर आरोपीला पंजाब पोलिसांच्या हवाली करण्यात आले.