esakal | विदेशातून आलेल्या आठ नागरिकांचे होम क्वारंटाईन
sakal

बोलून बातमी शोधा

Quarantine the home of eight citizens from abroad

संपुर्ण जगात थैमान घातलेल्या कोरोनो व्हायरसने महाराष्ट्रात देखील धुमाकुळ घातला असून देशात सर्वात जास्‍त कोरोना बाधितांची संख्या ही महाराष्ट्रामध्ये आहे. महाराष्ट्रात कोरोना बाधितांच संख्या 63 वर गेली असून एकाच दिवसात 11 रुग्‍णांची वाढ झाल्‍याने शासनाच्‍या वतीने उपायोजनांमध्ये वाढ करण्यात येत आहे. खामगावात आतापर्यंत आठ नागरिक विदेशातून दाखल झाले असून त्यांचे रुग्णालयाकडून होम क्वारंटाईन सुरू आहे. 

विदेशातून आलेल्या आठ नागरिकांचे होम क्वारंटाईन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

खामगाव (जि.बुलडाणा) : संपुर्ण जगात थैमान घातलेल्या कोरोनो व्हायरसने महाराष्ट्रात देखील धुमाकुळ घातला असून देशात सर्वात जास्‍त कोरोना बाधितांची संख्या ही महाराष्ट्रामध्ये आहे. महाराष्ट्रात कोरोना बाधितांच संख्या 63 वर गेली असून एकाच दिवसात 11 रुग्‍णांची वाढ झाल्‍याने शासनाच्‍या वतीने उपायोजनांमध्ये वाढ करण्यात येत आहे. खामगावात आतापर्यंत आठ नागरिक विदेशातून दाखल झाले असून त्यांचे रुग्णालयाकडून होम क्वारंटाईन सुरू आहे. 

याबरोबरच विदेशातून व मुंबई, पुणे यासारख्या मोठ्या शहरातून परतणाऱ्यांची तपासणी होत आहे व त्‍यांना 'होम कोरंटाईन' ठेवण्यात आहे. ज्‍या नागरिकांना ‘करोना विषाणू’ची बाधा झालेली नसून ते ‘करोना विषाणू’बाधित देशातून प्रवास करून आले आहेत. ज्यांना सर्दी खोकला आहे अशा रुग्णांना भरती करून त्‍यांच्‍या रक्‍ताचे नमुने नागपूर प्रयोगशाळेमध्ये पाठविण्यात येत आहेत. मात्र जे लोक पुणे मुंबई किंवा आपल्या देशातील अन्य शहरातून आले आहेत त्यांनी घाबरून जाऊ नये, सर्दी खोकला असल्यास उपचार घ्यावेत, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, मास्क किंवा रुमाल वापरावा, हात नियमितपणे साबण सेनेईटायझर ने स्वच्छ धुवावे अशा सुचना देण्यात येत आहेत. 


विदेशातून आलेले नागरिक
पॅरिस - 5
लंडन -  1
फिलिस्पिन - 2

कोरोना आजार पसरू नये यासाठी आरोग्य यंत्रणा सतर्क आहे. बाहेरून येणाऱ्या रुग्णांची तपासणी आणि समुपदेशन करण्यासाठी बस स्थानकावर वैद्यकीय अधिकार्‍यांचे पथक नेमण्यात आले आहे. सामान्य रुग्णालयात सुद्धा समुपदेशन कक्ष सुरू करण्यात आला आहे रुग्णांसाठी आयसोलेशन कक्ष आहे. शहरात आठ नागरिक विदेशातून आले असून त्यांना होम कॉरेनटाईन करून नियमित तपासणी करण्यात येत आहे.
- डॉ निलेश टापरे, निवासी वैद्यकीय अधिकारी, खाम

खामगाव तालुक्यात कोरोना बाबत जागृती साठी ५० हजार पत्रके वाटप करण्यात आली आहेत. अशा वर्करला प्रशिक्षण देण्यात आले असून घरोघरी जाऊन जागृती केली जात आहे. कोरोनाची धास्ती घेण्याची गरज नसून योग्य ती खबरदारी घ्यावी.
- दिनकर खिरोडकर, तालुका आरोग्य अधिकारी, खामगाव

loading image