"आम्हाला प्रतिप्रश्न विचारुन प्रश्न सुटणार नाहीत"; फडणवीसांना अजित पवारांचं उत्तर

अतिवृष्टीमुळं शेतकरी व्याकूळ झाला आहे.
Ajit Pawar
Ajit PawarSakal

नागपूर : राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार हे सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी नागपूरमधील अतिवृष्टी भागाचा आढावा घेतला. तसेच सरकारवर निशाणा साधताना आम्हाला प्रतिप्रश्न करण्यापेक्षा ठोस कार्यवाही करा, अशा शब्दांत त्यांनी उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांना उत्तर दिलं. (Questioning us will not solve the problem of People Ajit Pawar reply to Fadnavis)

Ajit Pawar
Commonwealth Games: पहिल्याच दिवशी भारत-पाकिस्तान भिडणार; पहा संपूर्ण शेड्यूल

पवार म्हणाले, "अतिवृष्टीमुळं या भागात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. याबाबत आम्ही विचारणा केली तर तुम्ही मंत्रिमंडळात किती जण होते? अशी उत्तर दिली जातात. पण हे यावरच उत्तर नाही. नुकसानग्रस्त भागातील पंचनामे कसे ताबडतोब सुरु होतील? त्यांना मदत कशी होईल? दुबार पेरणीसाठी बियाणं कसं मिळेल? हे यावर उत्तर पाहिजे. पण यावर कोणी बोलत नाही. मी राजकारण करण्यासाठी हा दौरा करत नाहीए. राज्यावर संकट ओढवलेलं असताना विरोधकांची जी भूमिका असते ती पण महत्वाची असते. या दौऱ्यानिमित्त दुसऱ्यांनी निवेदन देऊन त्यावर आपण बोलणं आणि आपण प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर त्यातील बारकावे समजतात. नंतर ते चांगल्या पद्धतीनं सभागृहात मांडता येतात. फील्डवर जाताना अनेक प्रकारचा त्रासही सहन करावा लागतो"

Ajit Pawar
जळगाव : कोरोनामुळे पतीला गमावले, उपजीविकेसाठी महिलेचा सात मुलांना विकण्याचा प्रयत्न

काल चंद्रपुरात एक गोष्ट जाणवली की, जे मृत्यू पावले त्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ४ लाख रुपये शासनाने दिले पण जनावरं मृत्यूमुखी पडल्याप्रकरणी नुकसान भरपाई दिली गेली नाही. याबाबत काल वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन लावण्याचा प्रयत्न केला पण ते मिटिंगमध्ये असल्यानं बोलणं होऊ शकलं नाही. आज संध्याकाळपर्यंत पुन्हा त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करेल, असंही यावेळी पवार म्हणाले.

निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांनी कायम तयार रहावं

अजित पवार पुढे म्हणाले, या दौऱ्यात नागपुरातील स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या मी बैठक घेतली नाही, तेच मला भेटायला आले होते. निवडणूक असल्यावरच कार्यकर्त्यांनी तयार रहायचं असतं असं नाही, कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कायमच तयार राहिलं पाहिजे. आपण तहान लागल्यानंतर विहीर खोदत नाही, आधीच खोदून ठेवतो. त्याप्रमाणं हे काम आहे. या बैठकीत काही जणांनी त्यांच्या समस्या मांडल्या, समृद्धी महामार्गाचे प्रश्न सांगितले. काहींमध्ये समज गैरसमज होते, त्याची चर्चा झाली. काहींच्या नेमणुका झाल्यात ते भेटायला आले होते. यामध्ये महिला, युवती आणि सर्व प्रकारचे कार्यकर्ते भेटले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com