.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
gas Cylinder seized
वर्धा - समुद्रपूर तालुक्याच्या गिरड परिसरात गॅस सिलिंडरचा काळाबाजार होत असल्याचे वृत्त ‘सकाळ’मध्ये बुधवार (ता. १८) ‘गिरडमध्ये गॅस सिलिंडरचा काळाबाजार’ या मथळ्याखाली प्रकाशित केले. याची दखल घेत तालुकास्तरावरील पथकाने गिरड पोलिसांच्या सहकार्याने लगतच्या पेठ येथील विष्णू धरत याच्या घरावर छापा घातला. त्याच्याकडून तब्बल १९ गॅस सिलिंडर जप्त केले.