रेल्वेने हिंगणघाटला जाणारा दारूसाठा पकडला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 ऑक्टोबर 2019

वर्धा : नवजीवन एक्‍सप्रेसमध्ये कार्यरत पोलिसांना एका बोगीत बेवारस पडून असलेल्या बॅगवर संशय आला. त्यांनी बॅगची तपासणी केली असता त्यात मोठ्या प्रमाणात देशी दारू असल्याचे दिसून आले. या दारूची किंमत 9,370 रुपये असून तो दारूसाठा हिंगणघाट येथे जात असल्याचे तपासात पुढे आले. रेल्वे पोलिसांनी संदीप देशकर (रा. हिंगणघाट) याला अटक केली आहे.

नवजीवन एक्‍स्प्रेसमध्ये स्कॉर्टींग पार्टीचे कर्मचारी एम.सी. चौरासिया, आर. एस. यादव, विकास बोरवार, नीलेश मोरे बडनेरा ते चंद्रपूर दरम्यान कार्यरत होते. ते गाडीच्या एस-पाच क्रमांकाच्या बोगीत गेले असता त्यांना मोठ्या प्रमाणात बेवारस बॅग मिळून आल्या. या बॅगची तपासणी केली असता त्यात मोठ्या प्रमाणात दारूसाठा मिळून आला. दारूसाठ्याजवळ असलेल्या संदीप देशकर याला अटक करण्यात आली. त्याला या दारूसाठ्याबाबत विचारणा केली असता त्याने हा दारूसाठा बडनेरा येथून खरेदी केला असून तो हिंगणघाट येथे नेत असल्याचे कबूल केले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Railway police caught the liquor in the train going to Hinganghat