Chandrapur News: रेल्वे टीसी बनावट नोकरी प्रकरण: १५ युवकांची १ कोटी ३१ लाखांची फसवणूक

Railway TC Job Scam: चंद्रपूर येथे रेल्वेत टीसी पदावर नोकरी लावण्याच्या आमिषाने १५-१६ बेरोजगार युवकांची १.३१ कोटी रुपयांची फसवणूक उघडकीस आली. बनावट प्रशिक्षण प्रमाणपत्र, नियुक्तीपत्र व धनादेश देऊन आरोपींनी युवकांना कोलकाता येथे नेऊन विश्वास संपादन केला.
Chandrapur News

Chandrapur News

sakal

Updated on

चंद्रपूर : रेल्वेत टीसी (तिकीट तपासनीस) पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून १५ ते १६ बेरोजगार युवकांची तब्बल १ कोटी ३१ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मुजिबुर लतीफ कुरेशी (५०, चंद्रपूर), रवींद्र संबाजी वाघमारे (४५) आणि सुरेंद्र रामकृष्ण तेलंग (५०, नागपूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com