
सिंदखेड राजा - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ यांचा आज जन्मदिवस असून त्यांच्या ४२७ व्या जयंतीनिमित्त सिंदखेड राजा येथील जन्मस्थळी ‘राजमाता जिजाऊ जन्मोत्सव सोहळा’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते सूर्योदयावेळी शासकीय महापूजा करण्यात आली.