Amravati Crime: वरुड तालुक्यातील राजुराबाजार येथे शेतीविवाद आणि आर्थिक तणावामुळे दिलीप खुशालराव माहुरे यांनी विषप्राशन करून आत्महत्या केली. प्रतिभा माहुरे यांनी तक्रारीत हरिभाऊ विठ्ठल भोंडे यांच्यावर आरोप केला आहे.
अमरावती : वरुड तालुक्यातील राजुराबाजार येथे शेतीच्या कारणावरून सुरू असलेला वाद आणि आर्थिक विवंचनेला कंटाळून एकाने आत्महत्या केली, असा आरोप महिलेने वरुड ठाण्यात दाखल तक्रारीत केला आहे.