

Chandrapur Crime
sakal
राजुरा : प्रेमप्रकरणात अडसर ठरत असल्याच्या रागातून पत्नीच्या प्रियकराने पतीचा तलवारीने वार करून निर्घृण खून केला. ही धक्कादायक घटना शुक्रवार (ता. ५) सायंकाळच्या सुमारास हरदोना (बु.) येथे घडली. राजेश मेघवंशी (वय ३०) असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी पत्नी दुर्गा मेघवंशी, प्रियकर चंद्रप्रकाश मेघवंशी या दोघांना अटक केली.