Chandrapur: जलपर्णीच्या विळख्यात मालगुजारी तलाव ; ३५० कुटुंबांच्या उदरनिर्वाहावर गदा; मत्स्य व्यावसायिकांचा सात वर्षापासून संघर्ष.

Malgujari Lake Covered by Water Hyacinth: राजुरा येथील ऐतिहासिक मालगुजारी तलाव जलपर्णीच्या विळख्यात अडकला असून मत्स्य व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला आहे. सुमारे ३५० कुटुंबांच्या उदरनिर्वाहावर गंभीर संकट निर्माण झाले आहे
Chandrapur

Chandrapur

esakal

Updated on

राजुरा: राजुरा शहराच्या मध्यभागी असलेला ऐतिहासिक मालगुजारी तलाव सध्या जलपर्णीच्या विळख्यात सापडला आहे. यामुळे या तलावाचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. एकेकाळी शहराच्या सौंदर्यात भर घालणारा आणि शेकडो कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचे साधन असलेला हा तलाव आज दुर्लक्षामुळे विद्रुप बनला आहे. परिणामी मत्स्य व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला असून त्यावर अवलंबून असलेल्या सुमारे ३५० कुटुंबांवर आर्थिक संकट कोसळले आहे. मागील सात वर्षांपासून त्यांचा संघर्ष सुरू आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com