

Yavatmal News
esakal
यवतमाळ: राळेगाव तालुक्यातील बेपत्ता ३४ मुलींच्या प्रकरणात तक्रार नाही. त्यामुळे तपास कसा करावा, असा मोठा प्रश्न पोलिसांसमोर उभा ठाकला आहे. पोलिसांनी दिलेल्या आकडेवारीनुसार दोन वर्षांत ४३ मुली बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल होती. पोलिसांच्या चौकशीत ३५ मुली आढळून आल्या आहेत. तर उर्वरित नऊ मुलींचा शोध सुरू आहे. त्यामुळे राळेगावातील ३४ मुली बेपत्तांचे गूढ अद्यापही कायम आहे. दरम्यान, सोमवारी (ता. २०) संपूर्ण राळेगाव कडकडीत बंद होते.