esakal | ब्रेकिंग: शेतकरी नेते राकेश टिकैत यांची यवतमाळमधील सभा अखेर रद्द;  शेतकरी नेत्यांमध्ये नाराजी

बोलून बातमी शोधा

Rally of Rakesh tikait cancelled in Yavatmal due to corona }

या महामेळाव्याची तयारी पुर्ण झाली होती. कोरोनाच्या संदर्भाने काही अडचणी असल्या तरी नियमांच्या अधीन राहून ही सभा होणार असल्याने शेतक-यांनी सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन संयुक्त किसान मोर्चाचे नेते संदीप गिड्डे पाटील तसेच श्रीकांत तराळ यांनी केले होते.

ब्रेकिंग: शेतकरी नेते राकेश टिकैत यांची यवतमाळमधील सभा अखेर रद्द;  शेतकरी नेत्यांमध्ये नाराजी
sakal_logo
By
राजकुमार भितकर

यवतमाळ : संयुक्त किसान मोर्चाचे राष्ट्रीय नेते राकेश टिकेत यांच्या सह राष्ट्रीय शेतकरी नेते आझाद मैदानावर 20 फेब्रुवारीला  दुपारी 1 वाजता किसान महा मेळाव्याला संबोधित करणार होते. मात्र त्यांची ही सभा रद्द करण्यात आली.

हेही वाचा -  मोठी अपडेट: अमरावतीत कोरोनाचा परदेशी स्ट्रेन नाही; नागरिकांना दिलासा; काळजी घेण्याचं आवाहन 

या महामेळाव्याची तयारी पुर्ण झाली होती. कोरोनाच्या संदर्भाने काही अडचणी असल्या तरी नियमांच्या अधीन राहून ही सभा होणार असल्याने शेतक-यांनी सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन संयुक्त किसान मोर्चाचे नेते संदीप गिड्डे पाटील तसेच श्रीकांत तराळ यांनी केले होते. सिकंदर शहा यांनी दिवसभर या संदर्भात पूर्ण तयारी केली होती. 

कोरोनाच्या संकटामध्ये प्रादुर्भाव वाढू नये म्हणून काळजी घेण्यात येईल. याठिकाणी सोशल डिस्टन्स पाळल्या जाईल. परीसर सॅनिटाईज करण्यापासून शेतकऱ्यांचे थर्मल स्कॅनिंग करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. ही सभा रद्द झाल्याने शेतकरी संतप्त झाले आहे तर विरोधकांच्या आनंदाला उधाण आल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

हेही वाचा - वाढत्या कोरोनामुळे शिक्षण मंडळाचे वाढणार टेन्शन; बोर्डाच्या परीक्षांवर विघ्न येण्याची शक्यता

शेतकरी नेते राकेश टिकैत यांची नियोजित सभा रद्द करण्यात आली आहे. ते यवतमाळ जिल्ह्यात आल्यास त्यांना14 दिवस क्वारंटाइन करण्याचा इशारा देण्यात आला होता. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी फोनवर संपर्क साधून ही माहिती दिली.
सिकंदर शहा,
यवतमाळ जिल्हा, आयोजक

संपादन - अथर्व महांकाळ