

Wardha Crime
sakal
वर्धा : कराटे शिकवणी वर्गात ओळख झाल्यानंतर लग्नाचे आमिष देत एका २० वर्षीय युवतीवर वारंवार अत्याचार केल्याची धक्कादायक घटना रामनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. संबंधित युवती पाच महिन्यांची गर्भवती असल्याचे वैद्यकीय तपासणीत समोर आले. तक्रारीवरून पोलिसांनी संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.