Ramtek Lok Sabha Election Results: पत्नीचं जातवैधता प्रमाणपत्र बाद ठरल्याने मिळाली संधी अन् श्याम बर्वेंनी 'रामटेक'वर झेंडा फडकावला

Ramtek constituency Election Result 2024 vs Congress Shyamkumar Barve Winner : रामटेक हा अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेला मतदारसंघ. याठिकाणी काँग्रेस आणि भाजपकडून हिंदू दलित उमेदवाराला तिकीट देण्यात आलं होतं. (Shivsena Shinde Raju Parve)
Shyamkumar Barve Raju Parve
Shyamkumar Barve Raju Parve

Ramtek Constituency: रामटेक हा चर्चेचा लोकसभा मतदारसंघ ठरला होता. कारण, याठिकाणी काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वे याचं जातवैधता प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्यामुळे ऐनवेळी त्यांना माघार घ्यावी लागली. त्यांच्याऐवजी त्यांचे पती श्यामकुमार बर्वे यांना मैदानात उतरावं लागलं. पण, त्यांनी मिळालेल्या या संधीचं सोनं केलं आहे. श्यामकुमार बर्वे यांनी रामटेकचा गढ सर केला आहे.

बर्वे यांच्याविरोधात काँग्रेसचे आमदार राहिलेले पण, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केलेले राजू पारवे यांना उमेदवारी मिळाली होती. पण, त्यांना मतदारांनी नाकारलं आहे. जवळपास ७५ हजार मतांनी बर्वे यांनी पारवेंचा पराभव केला आहे.

उमेदवाराचे नाव ---------मिळालेली मतं------- मताधिक्य

१. श्यामकुमार बर्वे (काँग्रेस)--- ६१३०२५ ----- ७६७६८

२. राजू पारवे (शिवसेना शिंदे गट) - -५३६२५७

रामटेक हा अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेला मतदारसंघ. याठिकाणी काँग्रेस आणि भाजपकडून हिंदू दलित उमेदवाराला तिकीट देण्यात आलं होतं. त्यामुळे रामटेकमधील १६ ते १८ टक्के लोकसंख्या असलेल्या बौद्ध समाजामध्ये याबाबत काहीशी नाराजी होती. रामटेक मतदारसंघामध्ये लढत काँग्रेस विरुद्ध शिदेंची शिवसेना अशी असी तरी खरी लढत आमदार सुनील केदार विरुद्ध भाजप अशीच असल्याचं दिसलं होतं.

Shyamkumar Barve Raju Parve
Nagpur Lok Sabha Election Results: नागपुरकर पुन्हा गडकरींच्या बाजूने की यावेळी विकास ठाकरेंना साथ?
Ramtek
Ramtek

रामटेकमध्ये विधानसभेचे एकूण सहा मतदारसंघ येतात. यात काटोलमध्ये शरद पवार गटाचे अनिल देशमुख, सावनेरमध्ये काँग्रेसचे सुनील केदार, उमरेडमध्ये राजू पारवे, कामठीमध्ये भाजपचे टेकचंद सावरकर, हिंगणामध्ये भाजपचे समीर मेघे आणि रामटेकमधून अपक्ष आशिष जयस्वाल हे आमदार आहेत. राजू पारवे हे भाजपकडून लोकसभेसाठी इच्छुक होते, पण ऐकवेळी त्यांना शिवसेनेत प्रवेश देण्यात आला अन् सोबत लोकसभेचं तिकीट देखील देण्यात आलं.

ramtek in 2019
ramtek in 2019

२०१९ ची स्थिती काय होती?

२०१९ मध्ये माजी आयएएस अधिकारी काँग्रेसचे किशोर गजभिये यांनी शिवसेनेच्या कृपाल तुमानेंविरोधात निवडणूक लढवली होती. त्यांना त्यावेळी यश आले नसले तरी त्यांना २०२४ च्या लोकसभा तिकीटाची अपेक्षा होती. काँग्रेसने तिकीट नाकारल्याने त्यांनी बंडखोरी केली अन् ते अपक्ष म्हणून मैदानात उतरले होते. त्यामुळे गयभिये काँग्रेसची मते खाण्याचा धोका होता. २०१९ मध्ये तुमाने यांना ५,९७, १२६ मतं (४९.९० टक्के) मतं मिळाली होती. तर गयभिये यांना ४,७०, ३४३ (३९.३० टक्के) मतं मिळाली होती.

२०१९ मध्ये उमेदवारांना किती मतं

कृपाल तुमाने- ५,९७, १२६ मतं

किशोर गजभिये- ४,७०, ३४३ मतं

ramtek issues
ramtek issues
Shyamkumar Barve Raju Parve
Bhandara–Gondiya Lok Sabha Election Results: प्रशांत पडोळे देणारे सुनील मेंढेंना धोबीपछाड? दिग्गज नेत्यांनी लावला होता जोर

कृपाल तुमाने यांचे तिकीट कापल्याने नाराजी?

शिंदे गटाचे आमदार कृपाल तुमाने यांना यावेळी तिकीट कापण्यात आलं. खरं म्हणजे त्यांनी बंडखोरीवेळी शिंदेची साथ दिली, पण त्याचं फळ त्यांना काही मिळालं नाही. त्यामुळे त्यांच्यात आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती अशी चर्चा होत होती. राजू पारवे यांची उमरेडबाहेर फारशी ओळख नव्हती. तरी त्यांच्यामागे भाजपने संघटनात्मक शक्ती भक्कमपणे उभी होती. दुसरीकडे, बर्वे यांच्यामागे सुनील केदार यांनी ताकद उभी केली होती. त्यामुळे या मतदारसंघातील विजयाकडे राज्याचे, खास करुन विदर्भाचे लक्ष लागले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com