August Revolution Day: रामटेकने १३ ऑगस्ट १९४२ रोजी अनुभवले एक दिवसाचे स्वातंत्र्य; धगधगत्या संग्रामाचा इतिहास दुर्लक्षित
One Day Freedom: १३ ऑगस्ट १९४२ रोजी रामटेकने ‘चले जाव’ आंदोलनात एक दिवसाचे स्वातंत्र्य अनुभवले. सरकारी कार्यालयांवर तिरंगा फडकवणाऱ्या क्रांतिकारकांचा इतिहास मात्र आज विस्मृतीत गेला आहे.
रामटेक : ९ ऑगस्ट १९४२ रोजी देशभर राबविण्यात आलेले ‘चले जाव’ आंदोलन रामटेकमध्येही प्रचंड ऊर्जा निर्माण करणारे होते. या आंदोलनाचा उत्कट परिणाम रामटेकमध्ये दिसून आला. १३ ऑगस्ट १९४२ रोजी रामटेककरांना एक दिवसाचे स्वातंत्र्य मिळाले.