ranveer tiger
sakal
खामगाव - बुलढाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्याच्या समृद्ध आणि सुरक्षित अधिवासाने आणखी एका वनराजाला आकर्षित केले आहे. टिपेश्वर आणि गौताळा अभयारण्याचा तब्बल ४९८ किलोमीटरचा खडतर प्रवास पूर्ण करत 'T3-C1' हा नर वाघ नैसर्गिकरीत्या ज्ञानगंगेत दाखल झाला असून, वनविभागाने त्याला 'रणवीर' असे नाव दिले आहे. या नव्या पाहुण्यामुळे अभयारण्यातील पट्टेरी वाघांची संख्या आता तीनवर पोहोचली आहे.