
वाशीम : आपल्या राष्ट्रासाठी तहान भूक हरपून भारतीय सैनिक लढत आहेत. प्रत्येक भारतीय नागरिकास याचा गर्व आणि अभिमान असायला हवा. भारतीय सैनिक आहेत म्हणून आपण सर्व आहोत. आपल्या राष्ट्राचे खरे हिरो हे भारतीय सैनिकच आहेत, असे गौरव पूर्ण उद्गार शिवसेना पक्ष नेत्या आ. भावना गवळी पाटील यांनी वाशीम येथे शिवसेनेच्या वतीने आयोजित तिरंगा सन्मान रॅली कार्यक्रमात काढले.