Maharashtra vidhansabha 2019 : बंडखोर डोणेकर, घोडेस्वार आधीच बाद

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 ऑक्टोबर 2019

नागपूर : जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदारसंघांतील नामनिर्देशन अर्जाच्या छाननीनंतर शनिवारी (ता. पाच) 178 उमेदवारांचे अर्ज वैध ठरविण्यात आले, तर 28 अर्ज अवैध ठरविण्यात आले. सोमवारी (ता. सात) अर्ज मागे घेता येणार असल्याने त्यानंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल. 

काटोल व सावनेर मतदारसंघांतील प्रत्येकी 11 उमेदवार वैध तर अनुक्रमे 2 व 3 अवैध ठरले आहेत. मध्य नागपूर मतदारसंघात सर्व 17 वैध ठरले. उत्तरमधून 17 वैध तर 3 अवैध ठरले असून, हिंगण्यामध्ये 13 वैध तर 3 अवैध, उमरेडमधून 15 वैध तर 2 अवैध ठरले आहेत. दक्षिण पश्‍चिम आणि दक्षिण विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी 20 वैध ठरले असून, अनुक्रमे 3 व 1 अवैध ठरले आहेत. पूर्व व मध्यमधून सर्वच अर्ज वैध ठरविण्यात आले. पश्‍चिम नागपूर व कामठी विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी 15 वैध ठरले असून अनुक्रमे 6 व 3 अवैध ठरविण्यात आले. रामटेक विधानसभा मतदारसंघात 12 वैध ठरले असून, 2 अवैध ठरले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The rebellious Donekar, the cavalryman has already fallen