esakal | मेळघाटात सापाच्या नवीन प्रजातीची नोंद
sakal

बोलून बातमी शोधा

छायाचित्र

मेळघाटात सापाच्या नवीन प्रजातीची नोंद

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर ः विदर्भातील नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिखलदरा येथे केलेल्या सर्वेक्षणात संशोधकांना सापाची एक नवीन प्रजाती शोधून काढली. यानिमित्ताने मेळघाटातील जैवविविधतेचे पुरावे पुन्हा एकदा जगासमोर आले आहेत. महाराष्ट्रातील सातपुड्याच्या शुष्क पानगळी वनांमध्ये आर्द्र वनांचा प्रकार केवळ मेळघाटातच आढळत असल्याने येथील परिसंस्था वैशिष्ट्यपूर्ण आहे.

वन्यजीव संशोधक क्रिष्णा खान आणि अंकित बिबेकर यांना वनदुर्ग गाविलगडच्या पायथ्याशी एक साप उंदीर खाताना दिसला. या सापाची छायाचित्रे व आवश्‍यक माहिती संकलित करण्यात आली. या नवीन सापाचे शास्त्रीय नाव "सिलॉगनेथस हेलेना निग्रीएंगूलरीस' आहे. याला इंग्रजीत "ऍरो-हेडेडे-ट्रिंकेट' असेही म्हणतात. या प्रजातीस राज्यात पर्यायी स्थानिक नाव नसल्याने याचे "शरशीर्षी तस्कर' असे मराठमोळे नामकरण खान यांनी केले आहे. सापाची ही जात बिनविषारी असून प्रामुख्याने उंदीर, पाली व सरड्यांवर गुजराण करते. आतापर्यंत ती पूर्व भारतात आढळली असून महाराष्ट्रात केवळ एकदाच चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पात सापडला आहे. मेळघाटातील नोंद ही "शरशीर्षी तस्कर' पहिलीच आहे.

"शरशीर्षी तस्कर'ची सरासरी लांबी शंभर सेमी असून डोक्‍यावर काळी बाणकृती खूण असते. ऊर्ध्व शरीरावर पैंजणासारखे उभे पट्टे आहेत. पार्श्‍व शरीरावर दोन समांतर जाड, आडव्या रेषा शेपटापर्यंत गेलेल्या आहेत, अशी माहिती निसर्गप्रेमी अनिकेत बिबेकर यांनी दिली. तसेच विष नसल्याने "शरशीर्षी तस्कर' हा अजगर किंवा ऍनाकोंडाप्रमाणेच भक्ष्यास विळखा घालून गुदमरून मारतात. या दुर्मीळ नोंदीबाबतचे संशोधन अमेरिकेच्या कानसास विद्यापीठातील "रेप्टाईल ऍण्ड एम्फिबियनस जर्नल'ने प्रकाशित केला आहे. या संशोधनाकरिता बिबेकर यांनी प्रत्युश मोहापात्रा (जबलपूर), क्‍लौस डिटीर शुल्झ (जर्मन), विराज जाऊळकर, अभिजित दाणी, एहसान शेख, धीरज शिंदे यांचे आभार मानले.

loading image
go to top